मान्सून आला तोंडावर, नालेसफाई राहिली वाऱ्यावर..

0
223

तळोदा -३०/५/२३

येत्या काही दिवसातच मान्सूनची आगमन होणार आहे
त्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरातील गटारी नाले तळापासून साफसफाई करावी या मागणीसाठी तळोदा नगर परिषदेचे मुख्यालय भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकांनी गाठलं
तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर वाहू लागले तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतील

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
रोगराई वाढेल म्हणून तळापासून नालेसफाई व गटारींची साफसफाई करावी ही मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना देण्यात आली
ते जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या पत्रावर निवेदन सादर करण्यात आलं लवकर साफसफाई केल्यास पावसाळ्याचे पाणी गटारीतून वाहून जाईल व जनतेच्या हाल होणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाने केली
शहरात अनेक जीर्ण इमारत आहे त्या मालकांना कायदेशीर नोटीस देणे जेणेकरून इमारत पडल्यास मनुष्यहानी होणार नाही त्याबाबत योग्य ती काळजी घेण्याच्या दृष्टीने नोटीसा बजवाव्यात ही देखील मागणी या माध्यमातून करण्यात आली
निवेदनावर माजी नगरसेविका शोभा गोळी,अंबिका शेंडे, योगेश पाडवी हेमलाल मगरे, सुरेश पाडवी,रामानंद ठाकरे, सविता पाडवी, तसेच योगेश चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
नितीन गरुड, तळोदा तालुका प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here