तळोदा माजी नगराध्यक्ष भरत माळींचा भाजपात प्रवेश..

0
975

तळोदा/नंदुरबार/मुंबई : २१/३/२३

राज्यात राज्याची समीकरण राजकीय बदलली की पक्षप्रवेशाचे सोहळे रंगतात..

त्यात आता भर पडली तळोदा शहरातील माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या भा. ज. पा. प्रवेश सोहळ्याचं चर्चा तर होणारच …


तळोदा काँग्रेसचे निष्ठावंत मानले जाणारे कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष भरत माळी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतलं..

आता तळोद्यात अधिक फुलणार भाजपचं कमळ ते भरत माळी यांच्या नेतृत्वाखाली..

त्यामुळे तळोद्यातील आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा मार्ग माळींच्या रूपाने मोकळा झाल्याचं बोललं जातंय.. मात्र तळोदा शहरातील काँग्रेसचा एका निष्ठावंत कार्यकर्ता माळी यांनी काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षात मुंबईत आज अधिकृत प्रवेश केलाय..

त्यामुळे तळोदा शहरातील इतर कार्यकर्त्यांच्या भुया अधिकच उंचावणार त्यात काही नवल नाही..

कित्येक दिवसांपासून प्रसार माध्यमांमधून चर्चा रंगल्या होत्या त्या भारतीय जनता पक्षात माळींच्या प्रवेश सोहळ्याच्या.. अखेर मुहूर्त ठरला..

आणि गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भरत माळींनी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकला…

सरपंच आणि उपसरपंचांसह सुमारे 400 500 कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत केलं..

यावेळी शिरपूरचे अमरीश भाई पटेल ,आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते…

पाहूया हा छोटेखानी सत्कार ..

यावेळी मुंबईतील पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार राजेश पाडवी यांनी भूमिका मांडली.. आणि पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत केलं आणि नेमकं मनोगतात काय म्हटले ऐकूया…

*नेमकं जाणून घेऊ या की भरत माळी आहेत तरी कोण?
*विविध राजकीय पक्षातील नेत्यांची आहेत त्यांचे सलोख्याचे संबंध
*तळोदा येथील विविध ट्रस्टचे आहेत अध्यक्ष
*संचालक धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक
*अध्यक्ष माळी समाज पंच
*अध्यक्ष माळी समाज सुधारणा मंडळ गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र
*सिनेट सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
*माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा
*नगरपालिका एक हाती स्वतः काबीज करणारे आणि तळोदा नगरपालिका आणि भरत माळी एक प्रकारे यांचं जोडलेलं होतं समीकरण
*काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख

अशा दिग्गज नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झाले.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपला पक्ष बांधणीसाठी तळोदा आता बालेकिल्ला बनवण्यात वेळ लागणार नाही तो भरत माळी यांच्या रूपातून…

त्यांच्या समवेत गणेश सोशल ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी, काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी अनिल माळी ,पंकज राणे ,आकाश वळवी, अरविंद पाडवी ,विजय क्षत्रिय ,अविनाश माळी ,कैलास पाडवी, राजू प्रधान योगेश पाडवी, नंदू जोहरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला..

विरोधी पक्षात बसणारे भरत माळी आता येत्या तळोदा नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षात बसतील का आणि यापुढे एकही विरोधक शिल्लक राहील का कारण महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे नेते कमी होत चालले पक्ष तिथेच राहिला

परंतु भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक प्रबळ होताना दिसते..

शहरातील जनतेचे लक्ष आता नगरपालिका निवडणुकांकडे लागून आहे.. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष हाच राजकीय सामना अधिकच रंगताना आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल हे म्हणणं वावगे ठरू नये..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही न्यूज, तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here