नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर निधी वेळेत खर्च करावा

0
358

नंदुरबार पालिकेत पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावितांनी घेतली आढावा बैठक

नंदुरबार -४/५/२३

नंदुरबार :- नंदुरबार व शहादा नगरपालिकांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान व जिल्हा वार्षिंक योजनेतून मंजूर झालेला निधी विहीत वेळेत खर्च करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत.

नंदुरबार नगरपरिषदेत आज पालकमंत्री डॉ.गावित यांनी नंदुरबार व शहादा नगरपरिषद व पालिकांच्या नविन प्रस्तावित कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस खासदार डॉ.हिना गावित, नंदुरबार न.प. मुख्याधिकारी पुलकित सिंह, शहादा नगरपालिकेचे स्वप्नील मुधलवाडकर आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
b08f5043 7fa4 4989 b041 3d94cc741b59

यावेळी मंत्री डॉ.गावित म्हणाले की, राज्य शासनाकडून तसेच जिल्हा वार्षिंक योजनेतून नगरपरिषदांना ११५ कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामांचे अंदाजपत्रके, नकाशे, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचे प्रस्तावांना त्वरीत मंजूरी देवून हा निधी विहीत वेळेत खर्च करावा.

नंदुरबार व शहादा नगरपालिका हद्दीतील जुन्या वसाहतींच्या ठिकाणी नवीन रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

ज्या भागात रस्ते, वीज, गटारी व पिण्याच्या पाणी उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी नागरिकांना सर्व मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत रस्ते व डि.पी रोडची प्रस्तावित कामे त्वरीत करावीत. पालिकेच्या मोकळ्या जागेत वाचनालय, युवक माहिती केंद्र, अभ्यासिकांची बांधकामे करावित.

आदिवासी उपयोजनेत तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत मंजुर निधींची कामे करतांना ज्या भागात यासमुहांची लोकवस्ती असेल अशाच ठिकाणी निधी खर्च करण्यात यावा.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नागरिकांच्या सुरक्षितेसाठी नंदुरबार, शहादा शहरातील सीसीटीव्ही प्रणाली लावण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच नंदुरबार व शहादा शहरातील महत्वांच्या ठिकाणी सिंग्नल व पार्कींगची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

बैठकीस नगरपालिका शाखेचे अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here