नंदुरबार : ४/४/२०२३
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथे वनविभागाच्या पथकाने धाड टाकून एकूण 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय..
मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथे वनविभागाच्या पथकाने धाड टाकली
यावेळी सागवानी लाकडापासून दरवाजे खुर्ची पलंग सेट बनवल्याचे फर्निचर मिळून आले..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
पथकाने एकूण 0.337 घनमीटर असलेला माल तीन सागाच्या लाकडाचे नग तीन पलंग सेट असा एकूण 45 हजार रुपये किमतीचे फर्निचर जप्त केले…
ही कारवाई वनसंरक्षक दी.वा पगार यांच्यासह कृष्णा भवर ,संजय पाटील, धनंजय पवार ,मंगेश चौधरी ,वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली…
मंगेश चौधरी, कल्पेश अहिरे ,कमलेश वसावे ,तुषार नांद्रे ,अक्षय भोळे, दिपाली पाटील, भाग्यश्री पावरा ,वाहन चालक दीपक भिवंडी, बाळा गावित यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली…
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक, एम.डी. टी.व्ही .न्यूज नंदुरबार