Gadchiroli News Today : १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात..!

0
162
Gadchiroli News Today tobacco worth 18 lakh seized, three arrested

Gadchiroli News Today – किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्याकरिता दोन वाहनांमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १८ लाख २७ हजार रुपये किमतीचा तंबाखू जप्त करण्यात आला आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

गंगाधर चिचघरे, महेश सुधाकर भुरसे, सोमेश्वर भास्कर चिचघरे व अमोल अनिल भुरसे अशी आरोपींची नावे असून, ते आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील रहिवासी आहेत. हे तिघेही आज कुरखेडा-वैरागड मार्गाने दोन वाहनांमधून सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाणेगावजवळ वाहने अडवून त्यातून १८ लाख २७ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here