गौतमी पाटील : आडनाव बदलविण्यावरुन नवा वाद .. कुटुंबियांच्या भावनिक प्रतिक्रिया ..

0
614

शिंदखेडा /धुळे -३०/५/२३

सध्या महाराष्ट्रात अतिशय चिंतेचा आणि जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अख्खा महाराष्ट्र या समस्येमुळे चिंताग्रस्त झालेला आहे.
ही समस्या म्हणजे गौतमी पाटील .
तिच्या नृत्यामुळे आतापर्यंत अनेक वाद निर्माण झाले आहेत.
आता तिच्या आडनावावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे.
तिने पाटील हे आडनाव लावू नये म्हणून काही मराठा संघटना व त्यांच्या नेत्यांनी इशारे दिले आहेत.
जणू काही पाटील या आडनावाचे पेटंट या मराठा संघटनांकडेच आहे.
त्यामुळे अन्य कुणाला हे आडनाव वापरता येणार नाही. वापरायचेच असेल तर या स्वयंघोषित मराठा नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल.
याविषयी विशेष वृत्तांत शिंदखेडा तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत यांनी करुन काही गौतमी पाटील हिच्या आजोळ गाव शिंदखेडा येथील नाते कुंटुबातील , सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.


चोपडा तालुका वेळोदे येथील मुळ गाव असलेली गौतमी पाटील आहे.
तिचा जन्मच धुळे जिल्हा शिंदखेडा येथेच झाला.
लहानाची मोठी देखील शिंदखेडयात झाली. कौटुंबिक वादात तिचे वडील जरी सोडून गेले तरी तिचा व आईचा सांभाळ तिचे आजोबा अभिमन आनंदा भामरे परिवाराने केला.
आई हातमजुरी करीत गौतमीला वाढवु लागली येथील जनता हायस्कूल मधेच आठवी पर्यंतचे शिक्षण करीत हायस्कूल मध्ये देखील कलागुण सादर करायची असे तिच्या वर्गमैत्रिणी सांगतात. मुलीचे पाय पाळण्यात दिसतात. या उक्तीप्रमाणे आज सर्वत्र आपल्या कलागुणांमुळेच सुप्रसिद्ध झाली. हे अनेकांच्या पोटात दुखु लागले.
हयावर शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी अरुण देसले हयांनी आपल्या प्रतिक्रियेतुन म्हणतात की, गौतमी पाटील हीचे आजोबा अभिमन आनंदा भामरे हे आहेत. त्यांच्या घरी लहानाची मोठी झाली
आमच्या कडे नेहमी तिचे व तिच्या आईचे येणं असायचे मी जवळुन पाहिले आहे.
ती आपली कला सादर करण्यात लहानपणापासून पारंगत होती.
शालेय दशेपासुन लग्न कार्यात उत्कृष्ट नृत्य करायची. लहान वयात उत्कृष्ट अभिनय मुळे तिला शाबासकी तेवढीच मिळायची.
हे असतांनाच महाराष्ट्रात तिच्या नृत्यावर बंदी आणावी हयासाठी अनेकांनी खटाटोप केली
बदनामी आणि आतातर पाटील आडनाव बदलविण्याचा केविलवाणा प्रकारामुळे सध्या नवा वादाला ठिणगी मिळाली आहे
हे एकप्रकारे कलागुणांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कला ही विशिष्ट जाती धर्मापुरती मर्यादित आहे का, मी अशा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की, ती मुळ पाटील जातीत जन्माला आली आहे तीची जात तिच राहणार
कला सादर करणे ,अभिनय करणे हे कलागुणांवर असते.जाती धर्मावर नव्हे.
हा आडनाव बदलविण्याचा नवा वाद इथेच थांबवावा.
जातीचा पुढका आणु नका जेव्हा तिच्या ह कुंटुबाची परिस्थिती खालावली होती
तेव्हा कुठे गेली होतीस जात.
आजपर्यंत चित्रपट सुष्टीत व्हालीवुड , बॉलीवुड मधील अभिनेत्रीं तोकडे ( अखुड पॅन्ट ) कपडे परिधान करुन नृत्य प्रकार करतात
त्यातही अनेक जाती धर्माचे हे दिसत नाहीत का ? गौतमी तर संपुर्ण साडी परिधान करुन लावणी नृत्य प्रकार सादर करते.
म्हणून गौतमी पाटील च्या कलागुणांना प्रोत्साहन दयावे.
हीच हया निमित्ताने तमाम समाज बांधवाना सांगू इच्छितो.
तसेच गौतमी पाटील त्यांचे आजोबा अभिमन आनंदा भामरे सह प्रशांत भामरे यांनी देखील ती पाटील समाजात जन्माला आली ती पाटीलच आहे आणि राहणार कोणतिही जात ती बदलवु शकत नाही.
ती लहानपणापासून आमच्याच अंगाखांद्यावर खेळली आहे.
तिला लहान पणा पासुन नृत्य करण्याची आवड होती.
लग्न कार्यात आणि शालेय शिक्षण घेत असताना स्नेहसंमेलन सहभागी होऊन नृत्य सादर करायची.
कलेला कोणताच जात धर्म नसतो . आपल्या कलागुणांना घडलेल्या चुका माफी मागत बाजुला सारुन आता व्यवस्थित कला सादर गौतमी सादर करीत आहे नवीन पाटील आडनाव बदलविण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये असा समाज बांधवाना देत सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करत हा वाद इथेच थांबवावा ‌

गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्य कलेवर आरोप विषयी थोडे जाणुन घेऊ या

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
काही संदेशात्मक सल्ल्यावर नजर टाकुन पाहुया —
खरेतर, गौतमी पाटील हिचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग तयार झालेला आहे. नृत्य कार्यक्रमाच्या तिला भरपूर सुपाऱ्या मिळतात. त्यामुळे प्रस्थापित नृत्यांगणांची दुकाने बंद व्हायची वेळ आली आहे. सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, प्रिया बेर्डे अशा अनेक कलावंतांनी गौतमी पाटील हिच्यावर तोंडसुख घेतले आहे. गौतमीचे नृत्य अश्लिल असल्याचा आरोप घाडगे, बेर्डे सारख्या कलाकारांना गौतमी पाटीलने जशास तसे उत्तर द्यायला हवे होते. पण या पोरीने नम्रता व विनयता दाखविली.
त्यामुळेच त्यांनी गौतमीच्या आडनावावर आक्षेप घेतला.
मी आडनाव बदलणार नाही. हेच आडनाव कायम ठेवणार असल्याचे तिने ठणकावून सांगितले आहे. कायदेशीररित्या प्रत्येकाला आपले नाव, आडनाव काय असावे हे ठरविण्याचा अधिकार आहे.
एवढेच नव्हे तर आई वडिलांनी दिलेले नाव सुद्धा बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. त्यामुळे मराठा समाजाने तिच्या आडनावावर कितीही आदळआपट केली तरी जोपर्यंत ती स्वतः ठरवत नाही तोपर्यंत तिचे आडनाव कुणीच बदलू शकत नाही.
सध्या तरी गौतमी पाटील हिला सुगीचे दिवस आहेत. नियती गौतमीसोबत आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेला थयथयाट सुद्धा गौतमीला फायदाचाच ठरत आहे.

यादवराव सावंत ,शिंदखेडा, एम डी टि व्ही न्युज प्रतिनिधी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here