सीडीएस पूर्व प्रशिक्षणासाठी १४ जून रोजी मुलाखतीचे आयोजन

0
329

नंदुरबार :- भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिंसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी ३ सप्टेंबर, २०२३ रोजी संघ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी १४ जून,२०२३ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिेसेस (सीडीएस) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी १९ जून ते १ सप्टेंबर,२०२३ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६१ साठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र राहील. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे बुधवार १४ जून,२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी www.mhasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पीसीटीसी नाशिक सीडीएस-६१ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत आणावी.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 ईमेल pctcoic@yahoo.in वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पाटील यांनी केले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो धुळे, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here