नाशिक -१९/४/२३
जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विहीर खोदताना झालेल्या जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांचा जागीचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या हरसूलमधील हिरडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
लहू, महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावं आहेत. हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या हरसूलमधील हिरडी गावात ग्रामपंचायतची विहीर खोदताना हा अपघात झाला.
जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहू, महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावं आहेत.
हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
तेजस पुराणिक ,नाशिक प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

