नाशिक/पुणे : २९/३/२०२३
खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
अतिशय दुःख झाले.
त्यांच्या निधनाने ज्येष्ठ लोकप्रतिनिधी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, गिरीश बापट यांनी कामगार चळवळीपासून सुरुवात करत राजकारणात प्रवेश केला.
नगरसेवक, आमदार ते खासदार पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
विधिमंडळात काम करणारे ते माझे जुने सहकारी होते.
कामगार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने सोडविले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यातील समता पुरस्कार सोहळ्यास त्यांनी नेहमीच हजेरी लावली.
त्यांच्या निधनाने विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक कराआणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
मी व माझे कुटुंबीय बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो व मृतात्म्यास शांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
तेजस पुराणिक ,नाशिक जिल्हा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज