तळोदा :- महाराष्ट्रातील नुकतेच झालेले दलित हत्याकांड विरोधात राज्यभर आंबेडकरी संघटनांकडून तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे, आंदोलने, निवेदनाव्दारे निषेध नोंदविला जात आहे. आज दि.१४ जुन रोजी तहसिलदार तळोदा यांना याबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने व विचाराने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथील अक्षय भालेराव या तरुणाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढली म्हणून त्याचे जातीय मानसिकतेतून निर्गुण हत्या करण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच लातूरच्या रेनापुर मध्ये राहणाऱ्या गिरधारी तपघाले याला सावकाराने लाकडी दांडकाने मारहाण करून त्याची हत्या केली. तसेच एक तरुणी मनात काहीतरी स्वप्न घेऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येते. शिक्षण पूर्ण करून एक-दोन दिवसांनी घरी परतणार अशावेळी सुरक्षारक्षकाने ती एकटी आहे याची कल्पना असताना आणि रात्री तिच्या खोलीत शिरून तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारले, एवढा निंदनीय प्रकार राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई मुख्यमंत्री, गृहमंत्री राहत असलेल्या शहरात होतो.
हे सुध्दा वाचा
अजितदादा पवार नंदुरबारात … मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन – MDTV NEWS
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEW
या घटनेचा निषेध नोंदवीत असून मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे शासनाकडून तात्काळ मदत मिळावी. या निवेदनामार्फत राज्य शासनाकडे व गृह खात्याकडे मागणी करण्यात आली आहे. संबंधित आरोपीला कायदेशीर कारवाई करून त्यांना फाशी देण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा विशाल सामुद्रे तालुकाध्यक्ष, उध्दव पिंपळे जिल्हा महासचिव, सूर्या सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष, नितीन गरुड परिवर्तन युवा मंच, पंकज रामराजे तालुका संघटक, अभय सामुद्रे, योगेश पवार, रत्नदीप सामुद्रे, कृष्णा पाडवी, सुनील नाईक, मंगल धोबी आदींनी दिला आहे.
नितीन गरुड. एमडी.टीव्ही. न्युज तळोदा ग्रामीण.