BREAKING-मोठी कपात ,LPG सिलेंडर झाला स्वस्त ..

0
495

मुंबई -१/५/२०२३

LPG Gas Cylinders price: देशात मे महिन्यात खुशखबर आली आहे.

व्यावसायिक १९ किलोच्या सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय गॅस सिलिंडर्स पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी घेतला आहे. आज पासून १७१.५० रुपयांनी या सिलेंडरचे दर कमी झाले आहेत.

यामुळे वाढत्या महागाईमुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

१ मे रोजी केंद्र सरकारने देशातील नागरिकांना दिलासा देत व्यावसायीक एलपीजी सिलिंडर्सच्या दर कमी केले आहे.

आज पासून १९ किलोचा व्यावसायीक सिलेंडरचे दर १७१.५० रुपयांनी कमी झाले असून हा सिलेंडर आता १ हजार ८५६.५० रुपयांना मिळणार आहे. नव्या दरानुसार हा सिलेंडर मुंबईत १ हजार ८०८.५० रुपयांना मिळणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तर कोलकातामध्ये १ हजार ९६०.५० रुपये, चेन्नईत २ हजार ०२१.५० रुपयांना व्यावसायीक सिलेंडर मिळणार आहे. तर दिल्लीत हा सिलेंडर १ हजार ८५६.५० रुपयांना मिळणार आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार याआधी १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरसाठी दिल्लीत २ हजार ०२८, कोलकातामध्ये २ हजार १३२, मुंबईत १ हजार ९८० तर चेन्नईत २ हजार १९२.५० रुपये मोजावे लागत होते.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो , मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here