शिंदखेडा एस.एस.व्ही.पी एस. महाविद्यालयात झाला शुभारंभ
शिंदखेडा /धुळे -१६/७/२३
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहेत. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे लढण्याचे प्रशिक्षण देऊन त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शिंदखेडा येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै शं.दे.पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य, वाणिज्य आणि कै.भाऊसाहेब.म.दि.सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा येथे राजमाता जिजाऊ युवती संरक्षण व प्रशिक्षण शिबिराचे शुभारंभ 300 महाविद्यालयीन युवतींच्या सहभागाने करण्यात आला.
हे हि वाचा :
NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..
दिलासा : फिरते पशुवैद्यकीय पथक ठरेल नवसंजीवनी ..
सदर शिबिराचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार मल्हारराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून समाजातील विविध घटनांमुळे महिलांच्या मनात निर्माण झालेली भीती घालवून आत्मविश्वास पूर्ण स्वसंरक्षणाची मानसिकता निर्माण करण्याच्या हेतूने सदर प्रशिक्षण दिले जात आहे.यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची मानसिकता तयार करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल विकास संरक्षण अधिकारी चंद्रकिरण सिसोदे ,कल्पना भागवत, भारतीय स्त्री शक्ती संस्थेचे अध्यक्ष सुजाता शंखपाळ शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज धुळे …