वडजी) ता. भडगाव- १०/७/२३
भडगाव तालुक्यातील वडजी गावची ग्रामीण कन्या झाली पोलीस उपनिरीक्षक.. ग्रामीण भागातल्या मुली देखील आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून घवघवीत यश संपादित करीत आहे.. शेतकऱ्याची कन्या असलेल्या विद्या परदेशीनं कोणतेही क्लास न लावता सेल्फ स्टडी च्या माध्यमातून नुकतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत गरुड झेप घेतली आहे.. नुकतीच तिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून या गावातून प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान तिने प्राप्त केला आहे.. विद्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदी जेमतेम होती.. आई वडील शेतकरी असून मोठा भाऊ महेंद्र शिक्षण घेत होता.. सेल्फ स्टडीच्या माध्यमातून विद्यान अभ्यास केला.. विद्याचे वडील रूमसिंग परदेशी हे देखील तिच्यासोबत रोज धावण्याचा सराव करीत असत..
WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मुली सोबत बापही रस्त्यावर धावला :
विद्याचा दिनक्रम सांभाळण्यात मुलीच्या वडिलांचा सहभाग मोलाचा ठरला.. रोज सकाळ संध्याकाळ रस्त्यावर धावत ती सराव करायची. अहोरात्र मेहनत घ्यायची.. तिच्यासोबत विद्याचे वडील देखील हे सकाळ संध्याकाळ रस्त्यावर धावण्यास तिच्यासोबत धावायचे.. त्यामुळे त्यांना देखील शारीरिक व्यायाम मिळाला. अन विद्यान पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं आणि ती झाली पोलीस उपनिरीक्षक.. त्यामुळे विद्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंद मावेनासा झाला होता.
गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.. भडगावचे पत्रकार अशोक परदेशी, माजी उपसरपंच उषा परदेशी, सतीश पाटील यांनी विद्यार्थिनीसह कुटुंबांच अभिनंदन केलं आहे.. गावातून एक विद्यार्थिनी महिला पोलिस उपनिरीक्षक पदी विराजमान झाल्याने गावातील तरुण आणि तरुणींसमोर तिने स्पर्धा परीक्षाकडे वळण्याचा सल्ला देखील त्यांना दिला आहे..तिची प्रेरणा इतरांनी घ्यावी .. संघर्षमय प्रवासास विद्याला एमडी टीव्ही न्यूज च्या हार्दिक शुभेच्छा..
सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज जळगाव