अकोला : १४/३/२३
जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील सरकारी निम शासकीय आणि इतर कर्मचारी बेमुदत संपास बसले आहेत..
या संपाचा फटका विविध विभागात जाणवला..
14 मार्चपासून म्हणजे आजपासून बेमुदत संपावर कर्मचारी गेल्यामुळे जवळपास सर्वच विभागात शुकशुकाट पाहायला मिळाला..
अकोल्यात हीच परिस्थिती सारखीच पहावयास मिळाली…
तहसील कार्यालय पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय दुय्यम निबंधक पाणीपुरवठा आदी विभागात शुकशुकाट पाहायला मिळाला… वैद्यकीय सेवांवर त्याचा परिणाम जाणवला..
रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसलं..
दुय्यम निबंधक कार्यालय कारंजा येथे आले आणि संपत्ती दिवस चालणार अशी विचारणा करून घरी परतल्याने या विभागाशी संबंधित व्यवसाय करणारे दस्त लेखक हे आपल्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना समजावून सांगण्यात त्रस्त झाले…
लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांना पेन्शन मिळते मग सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन का नको असे निवृत्तीनंतर पेन्शन हाच निवृत्ती धारकांचा आधार मानला जातो
मग त्यावरच शासनाची कात्री का? यातून सुटतात ते लोकप्रतिनिधी पण सर्वसामान्यांना वेठीस का धरलं जातं ? असा सवाल संपकऱ्यांमधून केला जातोय..
संपकारांनी असे प्रश्न उपस्थित करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली..
आज त्यांच्या हक्काचा आणि व्यक्त करण्याचा दिवस होता तो त्यांचा बेमुदत संपाचा..
या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे अकोला प्रतिनिधी अशोक भाकरे यांनी..
अशोक भाकरे अकोला शहर प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज