शासकीय जमीन अतिक्रमण प्रकरण : सरपंचासह दोन महिला सदस्य वादाच्या भोवऱ्यात..

0
517

सारंगखेडा/ शहादा -7/6/23

फेस ग्रामपंचायत ची 2020 ते 2025 या पंचवार्षिकची निवडणूक पार पडली
निवडणूक आटोपल्यानंतर दोन महिला सदस्य व सरपंच यांनी ग्रामपंचायती गावठाण सरकार गट नंबर पाच व 180 वर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आलं
त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 पोट कलम 3 नुसार सरपंच व सदस्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा अर्ज फेटाळून लावला
अर्जदारांनी दाद मागण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय गाठलं
तक्रारदारांच्या वतीने एडवोकेट राहुल कुवर पाटील यांनी युक्तिवाद केला
युक्तिवाद झाल्यावर निकाल जाहीर झाल्यावर सरपंचासह सदस्य यांना पदावर पुढे चालू राहण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं
तर शासकीय गावठाण गट नंबर पाच मध्ये त्यांनी अतिक्रमण केलं असल्याचं स्पष्ट झालं
याबाबतचा 29/07/2022 चा पारित केलेला आदेश रद्द करण्यात आल्याचं समोर आलं
याबाबत तक्रारदार आणि गावकऱ्यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदेशाच स्वागत केलं
गणेश कुवर ,सारंगखेडा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here