नाशकात कर्मचाऱ्यांचा एल्गार..

0
399

नाशिक :१५/३/२३

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्रात ठिकठिकाणी बेमुदत संपाला सुरुवात झाली..

नाशकात देखील पंचायत समितीच्या आवारात विविध संघटनांनी पेन्शन संदर्भात घोषणाबाजी केली..

एक नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी 14 मार्चपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय..

नाशकात पंचायत समितीच्या आवारातून आढावा घेतला..

त्यावेळी विविध महिलांचा लक्षणीय सहभाग पहावयास मिळाला…

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेसह विविध सरकारी निमशासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांसह शिक्षक शिक्षकेतर संघटना माध्यमिक, आरोग्य विभाग बांधकाम विभाग यासह विविध सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या बेमुदत संपाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय…

त्याची प्रचिती आली आज नाशकात संपाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती आवारात..

समितीचा आवार सर्व कर्मचाऱ्यांनी भरून गेला होता..

एकच मिशन ..जुनं पेन्शन यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..

01

यानंतर जुनी पेन्शन संघटनेचे नाशिक तालुका अध्यक्ष प्रदीप पेखळे यांनी सविस्तर संवाद साधला… ऐकू या त्यांची संपाबाबतची भूमिका..

02

तर यावेळी प्रत्येक ठिकाणी महिलांचा लक्षणीय सहभाग पहावयास मिळाला..

महिलांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधलं..

कायम चूल आणि मूल या परंपरागत अडकून राहिलेल्या महिलांनी आपलं रौद्ररूप या निमित्ताने दाखवलं..

कारणही तसेच आहेत त्यांना हवंय जुन पेन्शन.. ऐकूया यासंदर्भात थेट संवाद साधला संघटनेच्या महिला प्रतिनिधींशी.. मुक्ता पवार नेमकं काय म्हणाल्यात..

03

14 मार्च अर्थात कालपासून बेमुदत संपाला सुरुवात झाली आणि उद्या 16 मार्च रोजी विराट मोर्चाचे आयोजन विविध संघटनांनी नाशकात केलंय..

त्या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागणीसाठी सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत..

राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांचे शिष्टमंडळ यात नेमकं काय समन्वय साधला जाईल .

आणि भविष्यात तोडगा निघणार का लवकरच संप मिटेल का आणि सर्व सेवा सुरळीतपणे पूर्व पदावर येतील ही आशा करूया..

जुनी पेन्शन संघटनेचे नाशिक तालुकाध्यक्ष प्रदीप पेखळे,महिला अध्यक्ष मुक्ता पवार ,वैभव ढोणे ,दत्तात्रय कारवाल ,जितेंद्र मानकर ,साहेबराव अहिरे , किरण सोनावणे , थेटे ,संगीता पांडव ,विक्रम पिंगळे ,संजय पेखळे ,नितीन घरकटे ,प्रशांत बोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here