भव्य पशु औषधोपचार व लसीकरण शिबिर…!

0
189

शांताराम कुवर सभापती पंचायत समिती साक्री आणि माधुरी देसले उपसभापती पंचायत समिती साक्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडलं.

पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत आव्हाड मिथुन पावरा मंगेश हेमांडे हेमंत महाले,संगीता बेले विनोद अहिरे यांनी तपासणी केली. सुमारे 300 च्या वर जनावरांना लसीकरण करण्यात आलं.

आयोजकांकडून मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. नाशिक येथील पशु चिकित्सालयातील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संदीप पवार यांनी तांत्रिक मार्गदर्शन केलं होतं…

साखरी पंचायत समितीचे डॉक्टर योगेश गावित यांच्यासह डॉक्टर ऋषभ, आमखेलच्या सरपंच विमल सोनवणे, उपसरपंच ज्ञानेश्वर पवार यावेळी उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला..


साक्रीहून राहुल नांद्रे एमडी टीव्ही न्यूज प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here