जल्लोषपूर्ण वातावरणात अक्कलकुवा शहरात शिवजयंती साजरी..

0
168

अक्कलकुवा :१०/३/२०२३

छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती महाराष्ट्र सर्वत्र उत्साहात साजरी झाली..

खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात देखील हा उत्साह पहावयास मिळाला.. उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाजवळ शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला..

प्रतिमापूजनासह भव्य मिरवणुकीतून शिवरायांचा जयघोष करण्यात आला..

विद्युत रोषणाई ढोल ताशांचा गजर यामुळे अक्कलकुवा शहर भगवेमय झाल्याचा पहावयास मिळालं.. नंदुरबार जिल्हाप्रमुख तथा विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती..

जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी हे देखील उपस्थित होते…

उषा बोरा ,संगीता पजराले ,लक्ष्मण वाडीले ,मगन वसावे ,राजेंद्र वसावे ,विनोद वळवी ,पृथ्वी पाडवी ,किरण चौधरी ,मनोज डागा ,जितेंद्र लोहार ,कुणाल जैन ,रोहित सोनार ,महावीर डागा, विजय डागा ,अमोल राणा ,आशिष कोचर, दीपक मराठे ,अश्विन सोनार यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.. पाहू या शिवजयंतीचा अक्कलकुवा शहरातील हा जल्लोष …

शुभम भन्साली अक्कलकुवा प्रतिनिधी एम.डी टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here