जय शिवरायचा जयघोष करत निघाली भव्य दिव्य मोटारसायकल रॅली ..

0
355

शिंदखेडा:२०/२ /२३

शॉर्ट
१. भा ज पचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब वानखेडे यांनी केलं भगवा चौकात प्रतिमा पूजन
२. शहरातून काढलेल्या मोटारसायकल रॅलीन वेधलं नागरिकांचं लक्ष
जय शिवाजी जय भवानी याचा गजर आज १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात करत शिवरायांचं नामस्मरण करण्यात आलं .शिंदखेड्यात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी झाली ..
शहरातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली भगवा चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.

ADVERTISEMENT

तसेच युवा झेरॉक्स येथे राहुल महिरे यांच्या नेतृत्वाखाली पुजन करण्यात आलं .

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ह्यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, उल्हास देशमुख, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन दगा बापू चौधरी, मनोहर पाटील, अँड. विनोद पाटील, चेतन परमार, जितेंद्र जाधव, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष प्रवीण माळी, रेल्वे प्रवासी आघाडीचे दादा मराठे, नारायण माळी, शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट चे चेअरमन स्वप्निल देसले, परेश देसले, ओबीसी सेलचे अध्यक्ष दिपक चौधरी, मयुर पवार, दिपक सोनार, चेतन देसले, सुयोग भदाणे, दिनेश सूर्यवंशी, नारायण माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर शहरातुन विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने सर्वस्तरीय डिजेच्या तालासुरात भव्य दिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

तसेच सामाजिक कार्यकर्ते सुयोग भदाणे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती जवळ मित्र परिवारातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली.

एकूणच शिवप्रेमींच्या उत्साह दांडगा होता …
यादवराव सावंत,प्रतिनिधी,शिंदखेडा,एम डी टी व्ही न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here