धुळे -४/५/२३
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा महिला आघाडी तर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळा व भव्य महिला मेळावा धुळ्यातील चंद्रशेखर आझाद नगर भागातील दाता सरकार मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. सदर मेळाव्यास महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत उपस्थिती लावली
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार तर प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महापौर . प्रतिभा चौधरी व विरोधी पक्षनेत्या . कल्पना महाले, यांच्यासह मोठ्या पदावर नियुक्त मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात आला.
व्यासपिठावर बेटी बचाव बेटी पढावच्या अध्यक्षा . अल्फा अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती . सारिकाताई अग्रवाल, मप्रातैम जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा मायाताई परदेशी, नगरसेविका लक्ष्मी बागुल, ज्योत्सना बबन थोरात, नगरसेविका वंदना थोरात, नगरसेविका . मंगला चौधरी, . छाया करनकाळ, वैशाली चौधरी, . भारती अनिल अहिरराव, डॉ. निशा सुशिल महाजन, प्रभाकर चौधरी सर आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष . छाया करनकाळ यांनी केले. प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी आपल्या भाषणांत महिलांनी स्वावलंबी व्हावे त्याकरिता संघटनेच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यास तयार असून त्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली. महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी नविन योजना घेवून सर्वांगिण प्रगतीसाठी प्रयत्न करणार असून राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न करणार आहे
महिला मंडळाने अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी महापौर प्रतिभा चौधरी म्हणाल्या की, समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून मी महापौर पदावर मोठ्या कष्टाने आली असून मला सर्वांचे सहकार्य लाभले आहे
तर विरोधी पक्षनेत्या कल्पनाकाकू महाले म्हणाले की, आज समाजाने केलेल्या भव्य दिव्य सत्काराने मी भारावले असून समाजासाठी मला जे काही शक्य आहे ते करण्याची मी प्रयत्न करेन असे नमूद केले.
शिवसेना जिल्हाध्यक्ष सतिष महाले यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने जिल्ह्यात केलेले कार्य व संघटनेची झालेली बांधणीचे कौतूक करत राजकीय पक्षाला लाजवेल अश्या प्रकारचे संघटनेचे काम असल्याचे कौतूक केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
गुजरात राज्य अध्यक्ष संजय चौधरी यांनी महिला मंडळाच्या उपक्रमास भरीव योगदान देण्याची तयारी दर्शविली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धरणगांव तालुका अध्यक्षपदी भारती हेमंत चौधरी यांची मान्यवरांच्या हस्ते निवड करण्यात येवून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
नारी शक्ती सन्मान सोहळ्यास जवळपास सुमारे ६८ तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमास जवळपास १००० हजारपेक्षा जास्त महिलांची लक्षवेधी उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा आघाडीचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष छाया कल्याण करनकाळ, विभागीय कार्याध्यक्ष वैशाली नरेंद्र चौधरी, . हेमलता अनिल चौधरी, सौ. मनिषा राजेंद्र चौधरी, सौ. शोभा किशोर थोरात, सौ. नलिनीताई रमेश करनकाळ, सौ. दिपालीताई तुषार चौधरी, मनीषा सजन चौधरी, यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.
सदर कार्यक्रमकरिता महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडी, वकिल आघाडी, जेष्ठ आघाडी, युवा आघाडी, डॉक्टर आघाडी यांचे सहकार्य लाभले
तर सुत्रसंचलन शहर अध्यक्ष गणेश चौधरी, सचिव दिलीप सुर्यवंशी, सेवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश श्रीराम चौधरी यांनी केले..
MD TV न्यूज ,धुळे तालुका प्रतिनिधी, दिलीप साळुंखे