अकोला : १९/३/२३
राज्यातील विविध विभागांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय..
त्यात अकोला जिल्ह्यात शनिवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली
सुमारे एक तासापेक्षा अधिक काय चालले आहे
या पावसासह गारपिटीने अनेक पिकांचे नुकसान केलं..
संत्री गहू भाजीपाला आधी पिकांचं कापणीचा हंगाम सध्या जिल्हा सुरू असून शेतकऱ्यांनी गहू मशीनद्वारे करण्यासाठी गंजी लावून ठेवली होती
मात्र सकाळी आलेल्या पावसामुळे शेतातील गंजी अनेक ठिकाणी ओल्या झाल्या
तर गारपिट मुळे उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं…
संत्री आंबा लिंबू टरबूज बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते…
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकलंय..
अशोक भाकरे ,अकोला प्रतिनिधी ,एम.डी.टी.व्ही न्यूज, अकोला