एच.डी.एफ.सी बँकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी..

0
405

धुळे -८/४/२३

धुळे तालुक्यातील नेर येथील एच.डी.एफ.सी बँकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न असफल झाला आहे.

तसेच नागपूर सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील नेर शिवारात असलेल्या एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. या एटीएम मध्ये 43 लाख रुपये होते

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

मात्र एकही रुपया या एटीएम मधून गेला नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

धुळे तालुक्यातील नेर शिवारात म्हसदी कडे जाणाऱ्या फाट्यावर असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे.

या एटीएम सेंटरचा शटर उचकवून आत मशीन तोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पहाटे झाला होता,

मात्र आज सकाळी कामावर आलेल्या रखवालदाराच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती लागलीच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळताच ते आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

पोलीस पथकाने एटीएम सेंटरच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता या फुटेज मध्ये तोंड बांधलेल्या एका व्यक्तीने शटर उचकावून आत प्रवेश केला.

यानंतर मशीनची तोडफोड केल्याची बाब निदर्शनास आली आहे.

धुळे तालुक्याच्या पोलीस पथकाने नरे गावच्या परिसरात पाहणी केली असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठीची हालचाल सुरू केली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.

MD TV न्यूज, धुळे तालुका प्रतिनिधी, दिलीप साळुंखे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here