साक्री/धुळे : ७/३/२०२३
धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात सोमवारी सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढलं..
या पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं
गारपिटीमुळे तासाभरात रस्ते आणि शेत शिवार बर्फाच्छादित झाले..
रविवारी शिंदखेडा तालुक्यातील बहुतेक भागात बे मोसमी पावसानं पिके आडवी झाली होती..
तर नाशिक जिल्ह्यात देखील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा आणि द्राक्ष पिकांना फटका बसला..
तर धुळे जिल्ह्यातही अवकाळी चे गारांसह आगमन झाल्याने शेतकरी धास्तावले होते.
सोमवारी सायंकाळी प्रचंड वारा आणि ढगाळ वातावरण झालं.
गारवा निर्माण झाल्यानंतर हलक्या सरी कोसळू लागले..
वादळी वाऱ्यासह गारपीट मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने पिकांना त्याचा मोठा फटका बसला..
प्रामुख्याने खोरी टिटाने आणि निजामपूर परिसरात अधिक गारपीट झाली..
या गारपीटीत झालेल्या नुकसानीचा अंदाज लगेच आलेला नाही..
मात्र शेतकरी हवालदिल झाला..
दिलीप साळुंखे धुळे प्रतिनिधी एमडी टीव्ही न्यूज