बीड -२९/४/२०२३
गेवराई तालुक्यातील विविध भागात आज दि,२८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाने हजेरी लावली ..
नदी नाल्यांना पूर आल्याचे विचित्र चित्र पाहायला मिळाले
कोमलवाडी, भोजगाव तसेच तालुक्यातील अनेक भागातील शेतातील गहू, ज्वारी, बाजरी व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना बेजार केले आहे.
अवकाळी पावसाने शेत पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, वादळी वाऱ्याने काही भागातील झाडे उन्मळून पडली आहेत.
अनेक ठिकाणच्या घरांवरचे पत्रे उडाले आहेत.
तसेच शेतात जनावरांसाठी बांधलेल्या गोठ्याचे छप्पर उडाले आहेत.
शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवार व शुक्रवार सलग दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम आहे.
विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला आहे.
फळबागांना आलेली फळे वादळी वाऱ्याने जमीनीवर पडली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके पावसाने हिरवली आहेत.
शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे.
तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
अवकाळी पावसानं बळीराजाचं कंबरडं मोडलंय ..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,बीड