धुळे -२५/५/२३
येथील काकाजी मंगल कार्यालयात आयोजित एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय महिला व बाल विकास विभाग शिंदखेडा यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्रीशक्ती समस्या समाधान शिबाराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबीराचे महिला बाल कल्याण समिती सभापती जि. प.धुळे संजीवनी सिसोदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे , गटविकास अधिकारी देविदास मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी एन. टी.पावरा , एम.टी.महाले ,धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती हर्षवर्धन दहिते , उप मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे हेमंत भदाणे, तालुका कृषी अधिकारी नवनाथ सावळे,शिंदखेडा पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पंचायत समिती सभापती वंदनाबाई ईशी , उपसभापती रणजितसिंग गिरासे , माजी सभापती राजेश पाटील , शिक्षण विस्तार अधिकारी भावना पाटील, डी.आर.पाटील, कृउबा संचालक प्रा. आर.जी.खैरनार, पं.स.सदस्य भगवान भिल, विरेंद्रसिंग गिरासे आदीची प्रमुख उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावना पाटील यांनी केले
स्वागतगित खटाबाई गिरासे, वंदना सोनवणे, वंदना वसईकर यांनी गायिले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती चे निमित्त साधुन शिंदखेडा तालुक्यातील महिलांना येत असलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शिंदखेडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्रीशक्ती समस्या समाधान शिबीराचे आयोजन केले होते .
सदर शिबीरात तहसील, महसूल, कृषी, शिक्षण, पंचायत समिती, पोलीस स्टेशन विभागाचे आदिनि स्टाल लावले होते त्यात महिलांना येत असलेल्या समस्या नोंदणी करताना समाधान देखील करण्यात आले.
शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून असंख्य महिलांचे समाधान करण्यात आले.
हया प्रसंगी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, विधवा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घ्यावा तसेच रेशनकार्ड, मतदान कार्ड यांसह अनेक योजनाचि माहिती दिली .
पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी महिला सुरक्षा , महिलांवर होणारे अन्याय अत्याचार , फसवणूक , पिळवणूक आदिचे महत्व देत पोलिसांचे सहकार्य महिला सुरक्षिततेसाठी नेहमी राहील.
यासह कृषी विभागाचे अधिकारी नवनाथ सावळे, गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी मार्गदर्शन केले . अध्यक्षस्थानी सभापती संजिवनी सिसोदे यांनी समस्या थेट जाणून घेतल्या.
संबंधित विभागाच्या योजनांची माहिती देत सरकार महिलांच्या बाजुने भक्कम पणे उभी असुन महिलांना सक्षमपणे उभे राहण्यासाठी समस्यांचे समाधान केले जाईल असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय , महिला बाल विकास विभाग शिंदखेडा चे प्रकल्प अधिकारी एन.टि.पावरा , एम टी महाले , संरक्षण अधिकारी संदीप मोरे, कनिष्ठ सहाय्यक सुनीता सोनवणे, सह सर्व पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज