‘सखी वन स्टॉप सेंटर’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – जलज शर्मा

0
195

धुळे :- केंद्र शासन पुरस्कृत ‘सखी वन स्टॉप सेंटर’ योजनेची आणि धुळे जिल्हा बालविवाह मुक्त होण्यासाठी प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक कृती आराखड्याची सर्व संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिले.

‘सखी वन स्टॉप सेंटर’कोविड-19 दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठीत जिल्हास्तरीय कृती दल, सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे, बाल कल्याण समिती सदस्य व केंद्र व्यवस्थापक ॲड.गायत्री भामरे यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, ‘सखी वन स्टॉप सेंटर’एक संवेदनशील योजना असून या योजनेच्या माध्यमातून संकटग्रस्त, पिडीत महिलांना मुलभूत सेवा देण्यात येत असल्याने याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीने शासनाच्या विविध विभागांकडून महिला व बाल विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेऊन गावपातळीवर जनजागृती करावी.

हे सुध्दा वाचा:

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

आई-वडील अपंग आहेत किंवा दोन्ही पालक जेलबंदी आहेत अशा पालकांच्या मुलांना लाभ मिळवून द्यावा, शाळा सोडलेल्या मुलींना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून अनुदान मंजूर करणे, १८ वर्षाच्या आतील मुलींचे बालविवाह होणार नाहीत यासाठी गावपातळीवर कार्यशाळा घेणे, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून महिलांच्या बचतगटांना कर्ज उपलब्ध करुन देणे, सामाजिक न्याय विभाग, पोलीस विभाग, महानगरपालिका व नगरपालिका विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची कार्यशाळांच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत संबधित विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून या कृती आराखडयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा:

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

जिल्ह्यात कोविड-19 दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी गठीत जिल्हास्तरीय कृती दलाने मा. सर्वोच्च न्यायालयाकडील निर्देशानुसार बाल न्याय निधी प्राप्त रक्कमेचा लाभ कोविड-19 मुळे एक पालक व दोन पालक गमाविलेल्या लाभार्थ्याना मिळवून देणे, शैक्षणिक साहित्याची रक्कम मिळण्यासाठी 14 बालकांच्या पात्र यादीस मंजुरी देण्यात येऊन नवीन अर्जावरही चर्चा करण्यात आली. या अर्जांवर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.शिंदे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करुन सध्या जिल्ह्यात गठीत समितीमध्ये दोन अशासकीय सदस्यांच्या निवडीबाबत चर्चा केली. जिल्ह्यात ४८ बालविवाह थांबविण्यास प्रशासनास यश आले असून चाईल्ड लाईन कॉल सेंटरला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत सखी वन स्टॉप सेंटरचे कामकाज, महिला व बालविकास विभागाच्या योजना, बालकांची काळजी व संरक्षण याबाबत सुरु असलेल्या कामकाजावर चर्चा करण्यात आली. बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी, अशासकीय सदस्य उपस्थित होते.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, धुळे – नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here