पंजाबराव डख व भारतीय हवामान खात्याचा अंदाज समाधानकारक तर अमेरिकन हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढविणार
पुणे -१९/४/२३
यंदाच्या मान्सून बाबत वेगवेगळ्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा पर्जन्यमान कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.
या संस्थेने देशात दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या आधी अमेरिकन हवामान विभागाने देखील भारतासह आशिया खंडातील काही देशात दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मात्र या दोन्ही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेच्या विपरीत भारतीय हवामान विभागाने यंदा चांगला मान्सून राहणार असल्याचे मत व्यक्त केल आहे.
दरम्यान, पंजाबरावांनी एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्यात १८ ते २० तारखेदरम्याम राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी बेमोसमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याशिवाय डखं यांनी देखील यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊसमान राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनच आगमन ८ जूनला होणार आहे. मान्सूनचे आगमन जरी आठ जूनला होणार असले तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हा २२ जून पर्यंत पोहचेल. २२ जूनपर्यंत राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.
यानंतर २७ जून ते ३० जून या कालावधीमध्ये राज्यात खरीप हंगामातील पेरण्या होतील असे देखील मत त्यांनी व्यक्त केल आहे.
याशिवाय यंदा २०२२ प्रमाणे चांगला पाऊस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून जूनच्या तुलनेत जुलैमध्ये आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात अधिक पाऊस राहणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पंजाबराव डख यांनी नुकतीच मानसून २०२३ बाबत मोठी माहिती दिली आहे.
या मान्सून अंदाजामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
वास्तविक डखं यांनी वर्तवलेला हवामान अंदाज हा तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकरी व्यक्त करत आहे. अशातच त्यांनी यावर्षी महाराष्ट्रातील काही भागात महापुराची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
तसेच सामान्य जनजीवन देखील विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार / पुणे