नंदुरबार :- तालुक्यातील काकर्दे ग्रामपंचायतीतर्फे क्रांतीज्योती सावित्रीआई फुले अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. सरपंच पुंडलिक मराठे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत मालकीची इमारत अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून दिली.
तरूणांना अभ्यासासाठी गावातच सुविधा व्हावी या हेतूने ग्रामपंचायत काकर्देव्दारा हा लोकाभिमुख निर्णय घेण्यात आला. अभ्यासिकेचे उद्गाटन राकेश माळी व रविंद्र बागुल यांनी केले. यावेळी उपसंरपंच किरण मराठे, कांतिलाल ठाकरे, वैशाली महाजन, विमलाबाई महाजन, रेखाबाई माळी, हिराबाई माळी, कलाबाई भिल, सुरेखा पाडवी, ग्रामसेवक शरद गायकवाड, विठोबा माळी व गावकरी तसेच युवकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
सरपंच पुंडलिक मराठे यांनी गावातील युवकांना स्पर्धा परीक्षासह शालेय अभ्यासासाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार