अभिमानास्पद ! देवरुख पोलिसांनी दिल या दांपत्याला जीवनदान ..

कोल्हापूर /१०/४/२३

खोल दरीत कोसळूनही संयम न सोडता अपघातग्रस्त दाम्पत्याने तातडीने 112 क्रमांकावरून माहिती दिल्याने अवघ्या 15 मिनिटात देवरुख पोलिसांनी धाव घेत गाडीतून तिघांना सुखरुप बाहेर काढत जीव वाचवला.

ADVERTISEMENT

कार थेट 100 फुट खोल दरीत कोसळूनही संयम न सोडता तातडीने 112 क्रमांकावरून माहिती दिल्याने अवघ्या 15 मिनिटात पोलिसांनी धाव घेत गाडीतून तिघांना सुखरुप बाहेर काढत जीव वाचवला.

गाडी थेट दरीत कोसळल्यानंतर सरळ खाली गेल्याने मोठा अनर्थ टळला.

SPONSORED CONTENT

देवरूख पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनं या दाम्पत्याचा जीव वाचला आहे.
कोल्हापूरचे विनायक मढवळ (वय 33), पत्नी सिद्धी मढवळ (वय 32) आणि त्यांची मुलगी मीरा (वय 4) हे कारने (एमएच-09- एफजे-8972) रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून कोल्हापूरला येत होते. साखरप्यापासून पुढे 2 किमी अंतरावर मुरडे घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने विनायक यांना समोर रस्ता दिसून आला नाही आणि याच काही सेकंदामध्येच कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळली.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

मात्र, आयुष्याची दोरी बळकट असल्याने सरळ खाली गेली.
कार ज्यावेळी दरीत कोसळली त्यावेळी मध्यरात्री दोन वाजले होते.

विनायक यांच्या पत्नी सिद्धी यांनी मोठ्या धैर्याने नातेवाईकांना आणि 112 नंबरवरून देवरूख पोलिसांना 8 एप्रिल रोजी 2 वाजून 9 मिनिटांनी सिद्धी मढवळ यांना माहिती देत आमचा अपघात झाला असून आम्हाला तत्काळ मदत हवी असल्याचे सांगितले.

यावेळी देवरुख पोलिस ठाण्यात राहुल गायकवाड होते. ते सहकाऱ्यांसह 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचले.

राहुल गायकवाड यांच्या सांगण्यावरून पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी पोहचले.

त्यानंतर दोरीच्या सहाय्याने दरीत उतरून प्रथम गाडीची डिकीतून मुलगी मीराला बाहेर काढले.

त्यानंतर सिद्धी आणि विनायक यांना बाहेर काढून सुखरूप दरीतून बाहेर काढले.

मध्यरात्री कोणीही मदतीला नसताना देवरूख पोलिसांच्या या मदतीमुळे मढवळ कुटुंबीयांना आधार मिळाला.

या अपघातामधे तिघेही सुरक्षित आहेत.

सारिका गायकवाड ,प्रतिनिधी कोल्हापूर ,एम डी टी व्ही न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here