साक्री :९/३/२०२३
नुकतंच जागतिक महिला दिन साक्री येथील विमलबाई पाटील कला आणि डॉक्टर भास्कर देसले विज्ञान महाविद्यालय साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदर्श महाविद्यालय निजामपूर येथील प्राचार्य डॉक्टर ए पी खैरनार लाभले..
महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री पुरुष समानता स्त्रियांचे हक्क आणि सुरक्षा यावर खैरनार सर यांनी प्रकाशझोत टाकला..
तर प्रमुख वक्त्या त्रिशीला साळवे यांनी भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानात स्त्रियांच्या हक्कांविषयी व सुरक्षा विषयी काय अधिकार दिलेत ते अधिकाऱ्यांवर प्रकाश टाकला..
प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या सचिव डॉक्टर मंगलाताई देसले होत्या..
त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.. प्राचार्य डॉक्टर पी एस सोनवणे यांनी स्त्रियांनी जीवनात सफल होण्यासाठी उच्च शिक्षणाने चांगल्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे, असा मौलिक सल्ला आपल्या मनोगतातून दिला..
निसर्ग मित्र समितीतर्फे इंदुताई सोनवणे यांना नुकताच उत्तम कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.. सूत्रसंचालन डॉक्टर ममता पंजाबी यांनी केलं..
प्रास्ताविक डॉक्टर करुणा अहिरे यांनी केलं..
आभार डॉक्टर कैलास वाघ यांनी मानले..
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आला..
दिलीप साळुंखे ,धुळे तालुका प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज