दीपक चहरचा पहाटे 5 वाजता भांगडा..

0
640

मुंबई -३१/५/२३

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला चेन्नई सुपर किंग्स संघाच्या रूपात विजेता मिळाला.
एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरात टायटन्स संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा धोबीपछाड दिला. यासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली.
या विजयानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. यामध्ये संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आघाडीवर राहिला.
चाहरने मैदानावर जल्लोष केलाच, पण तो जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा ढोल-ताशांच्या आवाजावर तो स्वत:ला रोखू शकला नाही.
त्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दीपक चाहर डान्स व्हिडिओ
दीपक चाहर (Deepak Chahar) याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत दीपक चाहर पत्नी जया भारद्वाज (Deepak Chahar With Wife Jaya Bhardwaj) हिच्यासोबत दिसत आहे.
व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ढोलचा आवाज येत आहे.
याच आवाजाच्या तालावर चाहर जोरदार डान्स करताना दिसत आहे.
चेन्नईची जर्सी परिधान करून चाहरने तुफान डान्स करत विजयाचा आनंद व्यक्त केला.
चाहरचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

गुजरातविरुद्धची कामगिरी
दीपक चाहर याच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 4 षटके गोलंदाजी केली. यावेळी गोलंदाजी करताना त्याने 38 धावा खर्च केल्या होत्या. विशेष म्हणजे, त्याने गुजरात टायटन्स संघाचा विस्फोटक सलामीवीर वृद्धिमान साहा याला 54 धावांवर असताना झेलबाद केले होते. एवढंच नाही, तर चाहरने संपूर्ण हंगामात चांगले प्रदर्शन केले. त्याने 10 सामन्यात 22.85च्या सरासरीने 13 विकेट्स चटकावल्या. यादरम्यान त्याने 8.74च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here