Chandrayaan-3 Launch:ऐतिहासिक क्षण! अवकाशात झेपावलं चांद्रयान-३…

0
482

श्रीहरीकोटा: १४/७/२३

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-३ लाँचसाठी सज्ज झालं आहे. देशाची ही तिसरी चांद्रमोहीम आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून दुपारी २.३५ वाजता हे चांद्रयान अवकाशात झेप घेईल. इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून याचं थेट प्रक्षेपण पाहता येत आहे .. ऐतिहासिक क्षण!
चांद्रयान-३ अखेर अवकाशात झेपावलं आहे. पुढील १६ मिनिटांमध्ये ते पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत पोहोचेल.लाईव्ह टेलिकास्ट सुरू
इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि वेबसाईटवरुन या प्रक्षेपणाचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू करण्यात आलं आहे. यासोबतच, दूरदर्शनवर देखील तुम्ही या लाँचचं थेट प्रक्षेपण पाहू शकता.

चांद्रयान-३

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
भारत रचणार इतिहास
चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे. तर, चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा भारत पहिलाच देश असणार आहे.
मोहिमेचं उद्दिष्ट
या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न भारत करेल. यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाचं सखोल परीक्षण करून, तेथील मातीतील मिनरल्स आणि इतर तत्वांची चाचणी करणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, चांद्रयान ३ विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. या यानाचं वजन ३,९०० किलो इतकं आहे. यातील मॉड्यूलचं वजन २,१४५.०५ किलो आहे. तर १,६९६.३९ किलो केवळ इंधन असणार आहे.
या यानानं अवकाशात झेप घेतल्यानंतर त्याचे काही भाग वेगळे झाले आणि मुख्य भागानं चंद्राकडं आगेकूच केली. यावेळी सतीश धवन केंद्रात केंद्र सरकारचे अनेक मंत्री उपस्थित होते. अवघ्या देशानं हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला.
चंद्रावर कधी पोहोचणार?
आज लाँच झाल्यानंतर चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान-३ ला सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागेल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ किंवा २४ ऑगस्ट या दिवशी चांद्रयान चंद्रावर उतरेल. काही अडचणी आल्यास, या तारखा बदलूही शकतात असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.
सॉफ्ट लँडिंगचं लक्ष्य
चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान विक्रम लँडर प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतानाच क्रॅश झालं होतं. त्यामुळं, आता चांद्रयान ३ मोहिमेत हे लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे हे सर्वात मुख्य लक्ष्य असणार आहे. चांद्रयान-३ मधील लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,श्रीहरीकोटा …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here