Jalgaon News : माँ साहेब मीनाताई ठाकरे ममता दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
518
jalgaon-news-mother-saheb-meenatai-thackeray-celebrated-mamta-day

Jalgaon News – शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या अर्धांगिनी सावली प्रमाणे साथ देणारी आम्हा तमाम शिवसेनेची माऊली माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पाचोर्यात ममता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे माननीय वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा-भडगाव, माननीय दीपक राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख, अरुण पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन सोहळा संपन्न झाला.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

jalgaon-news-mother-saheb-meenatai-thackeray-celebrated-mamta-day

यावेळी शिवसेना नेत्यांनी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या कार्याचे वर्णन केले. तसेच, शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

ममता दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका गाव तिथे शाखा याप्रमाणे शाखा उद्घाटन सोहळा शुभारंभ पिंपळगाव हरेश्वर-शिंदाड जिल्हा पंचायत गटातील गावापासून करण्यात आला. यात वाणेगाव, निंभोरी खू., निंबोरी बु, निंबोरी तांडा, शेवाळे, वाडी, पिंपरी खु प्र. पा. सातगाँव डोंगरी, वडगाव कडे, शिंदाड, गवहले आदी ठिकाणी शिवसेना युवासेना शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी राजू काळे, एडवोकेट दीपक पाटील शहर प्रमुख पाचोरा, अनिल सावंत शहर प्रमुख पाचोरा, संदीप जैन उपजिल्हाधिकारी, नितीन लोहार, सुनील पाटील, पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, जयश्री येवले, अनिता पाटील, रवी सोनवणे. अनिश शेख. नाना वाघ, संतोष सर, नंदू सर, शुभम राजपूत आदी उपस्थित होते.

jalgaon-news-mother-saheb-meenatai-thackeray-celebrated-mamta-day

यावेळी शिवसेना नेत्यांनी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती जपून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. तसेच, शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व नवीन शाखांमध्ये कार्यरत होणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here