‘मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं पण..’ फडणवीसांचा गंभीर आरोप; म्हणाले, कोणाच्या बापा..

0
129

नाशिक :दि.१२/०२/२०२३

” मी यांच्या बापाला कधीही घाबरलो नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं होतं. मात्र, मी जेलमध्ये गेलो नाही. ज्यांच्यावर जबाबदारी होते, तेच जेलमध्ये गेले”, असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

FosNge0aIAAEM29
“मंत्री, आमदार, खासदारांना मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

भाजपची नाशिकमध्ये महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, आमदार, खासदारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही संकल्प करण्यात आला.

2024 साठी 20-20 बॅटींग सुरू : देवेंद्र फडणवीस

आम्ही 2024 साठी 20-20 ची बॅटिंग सुरू केली आहे. आगामी निवडणुका शिंदे आणि आम्ही एकत्रित लढू आणि जिंकू देखील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. जी जबाबदारी भाजपमध्ये आपल्याला मिळाली त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीची सेवा करणे हा आपला धर्म आहे. ज्या योजना आपण बोलत आहोत. या सर्व योजना अन्‍त्‍योदयाच्या आहेत. आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायला हवा. यामध्ये अहंकाराचा त्याग पहिल्यांदा करावा लागेल. तरच खऱ्या अर्थाने सर्मपण दिन साजरा करू शकतो.

दोन वर्ष काही मागू नका, फक्त कार्य करा : फडणवीस

माझी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून अपेक्षा आहे. 2024 पर्यंत काय मिळेल याचा विचार सोडून द्या. आपल सर्मपण मी पक्षाकरीता मागत आहे. आपला वेळ आणि आपले श्रम मी मागतो आहे. पुढील दोन वर्षे आपला वेळ, श्रम पक्षाकरीता पदाधिकाऱ्यांनी द्यावं.

”आपल सरकार हे गद्दारांच नाही तर खुद्दरांचा सरकार आहे. गद्दार खाली पडले आणि आता खुद्दारांच सरकार आहे. आपण जे केल आहे ते नियमाने केल आहे. आपल्याला काही धक्का लागत नाही. आपल्याला सुप्रीम कोर्टातही काही धक्का लागत नाही. पुन्हा राज्यात आम्ही दीडपट जागा घेऊन निवडून येऊ,”असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

FosNgeuaUAAck2h
राज्यातील भा.ज.प.चे मंत्री,आमदार,खासदार आणि विविध पदाधिकारी

आपल्याकडे सेवेची ट्वेन्टी ट्वेटन्टी आहे. मात्र, मविआने भष्ट्राचाराची 20-20 खेळली. मी यांच्या बापाला कधीही घाबरलो नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं. मात्र, मी जेलमध्ये गेलो नाही. ज्यांच्यावर जबाबदारी होते तेच जेलमध्ये गेले, असा आरोप फडणवीस यांनी केला.

नाशिकहून तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here