Kamalnath Possibly To Join BJP : कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार? काँग्रेसला आणखी एक धक्का?

0
228
Kamalnath Possibly To Join BJP

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता मध्य प्रदेशमधूनही काँग्रेसला धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री ( Kamalnath ) कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ( Kamalnath Possibly To Join BJP )

कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा:

Kamalnath Possibly To Join BJP
  • कमलनाथ यांचा मुलगा आणि खासदार नकुलनाथ यांनी ट्विटरवरून काँग्रेसचे नाव हटवले आहे.
  • आज कमलनाथ आणि नकुलनाथ हे दोन्ही नेते दिल्लीला जात आहेत.
  • मध्यप्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी या दोघांचे भाजपमध्ये स्वागत करणार असल्याचे म्हटले आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसचे खंडन:

  • काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
  • दिग्विजय सिंह म्हणाले, “मी काल रात्री कमलनाथ यांच्याशी बोललो. ते छिंदवाडामध्ये आहेत आणि ते भाजपमध्ये जाणार नाहीत.

10 आमदारांसह कमलनाथ भाजपमध्ये?

Kamalnath Possibly To Join BJP with 10 Aamdar
  • कमलनाथ यांच्यासोबत त्यांचे 10 समर्थक आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
  • लोकसभा निवडणुका जवळ येत असताना हा काँग्रेससाठी मोठा धक्का असेल.

कमलनाथ यांना मोठी जबाबदारी?

  • कमलनाथ हे भाजपमध्ये गेल्यास त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
  • त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिले जाऊ शकते.
  • अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here