कोल्हापूर : पंढरपूरला जाणाऱ्या पाच भाविकांवर काळाचा घाला

0
206

बोलेरो ट्रॅक्टरवर आळल्याने अपघात; कोल्हापूर जिल्ह्यावर पसरली शोककळा

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याने यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजीव गांधीनगर येथे रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरोआणि विटाने भरलेला ट्रॅक्टर यांचा भीषण अपघात झाला आहे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील जयवंत पोवार हे कुटुंबियांसमवेत पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. रत्नागिरी- नागपूर या बायपास रस्त्याने जात होते. हा रस्ता दोन दिवसांपूर्वी सुरु झाला असून सदर या बायपास रस्त्यावर राजीव गांधीनगर या ठिकाणी विटांनी भरलेला ट्रॅक्टर – ट्रॉली विरोधी दिशेने आल्याने बोलेरो (क्रमांक- एमएच ०९ – डीए ४९१२) गाडी त्यावर समोरून जोरात आदळली.

edcd602b e570 4166 a6e9 ecbbfb17abe3

या धडकेत बोलेरो गाडीतील तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे. यात सोहम पवार ( वय १२), जयवंत पोवार (वय ४५) , कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) (सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) यांचा समावेश आहे. ३५ वर्षीय बोलेरो चालकाचे नाव अद्याप कळालेले नाही. मयत पाच जण हे सरवडे येथील (ता. राधानगरी) आहेत. तर या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबतची नातेवाईकांना माहिती मिळताच ते तात्काळ मिरजेला रवाना झाले आहेत. जखमी तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख, महात्मा गांधी चौकीचे भालेराव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. सरवडे येथील सर्व व्यवहार बंद करण्यात आले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे

सारिका गायकवाड. एम.डी.टी.व्ही. न्युज, कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here