नाशिक : :१८/४/२३
नाशिककर आंबा प्रेमींना नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला निर्यातक्षम दर्जाचा हापूस आंबा रास्त दरात उपलब्ध होणार आहे.
कोकण पर्यटन विकस संस्थेच्या वतीने आज (दि. १८) पासून १६ वा ‘कोकण आंबा महोत्सवा’स त्र्यंबक नाक्यावरील पिन्याकल मॉल येथे प्रारंभ होत असल्याची माहिती संचालक दत्ता भालेराव यांनी दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र चेम्बरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबा महोत्सवाचे आज सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे
या महोत्सवासंदर्भात अधिक माहिती देताना भालेराव म्हणाले, कोकणातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, केळशी, पावस, गुहागर, संगमेश्वर आदी ठिकाणच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टोल्स यामध्ये राहणार आहेत.
नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला निर्यातक्षम दर्जाचा हापूस आंबा नाशिककरांना रास्त दरात उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
आंब्याव्यतिरिक्त काजू, फणस, करवंद, जांभूळ, आवळा यांपासून बनवलेला कोकणमेवा विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. कोकणातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांची माहिती महोत्सवात दिली जाणार आहे.
सदर महोत्सवास नाशिककरांनी आवर्जून भेट देण्याचे तसेच अधिक माहितीसाठी ९६८९०३८८८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दत्ता भालेराव यांनी केले आहे.
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक