कृऊबा निवडणूक : प्रचाराला वेग अन माघारीसाठी मनधरणी !

0
181

दहा हजार मतदारांच्या हाती १०८ सदस्यांचे राजकीय भवितव्य
ग्रामीण भागात राजकीय वातावरण निघतेय ढवळून

new project 2021 02 24t212947.230 202102567853 1

नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा व नवापूर या कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. दि.२७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत इच्छुकांकडन्ूा नामांकन दाखल करण्यात आले. यात ५०३ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. यात छाननीअंती ३९ नामांकन बाद झाल्यानंतर ४६३ इच्छुकांची नामांकने वैध ठरली आहेत. तर दि.२० एप्रिल माघारीची अंतिम मुदत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

असे असले तरी माघारीपूर्वीच इच्छुकांकडून तसेच विविध पक्षांच्या नेत्यांकडून बाजार समितीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कंबर कसण्यात आली असून प्रचाराचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून आता इच्छुकांकडून माघारीपूर्वीच प्रचाराला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी १० हजार १३५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ते १०८ संचालक निवडून देतील. या निवडणुकीसाठी उमेदवारांसह नेत्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. बाजार समितींचे समीकरण बदलविण्याची ताकद मतदारांच्या हातात असल्याने राजकीय पक्ष, गटांकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत १८ संचालक याप्रमाणे एकूण १०८ संचालक निवडून द्यायचे आहेत. ग्रामीण भागातील राजकारण देखील आता ढवळुन निघाले आहे. जिल्ह्यातील पक्षाच्या दिग्गज नेत्यांकडून व विविध गटाच्या नेत्यांकडून प्रचार करण्यात येत आहे.

असे आहेत मतदार…

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण २ हजार ७२७ मतदार असून यात ग्रामपंचायत अंतर्गत १२४५, हमाल मापाडी २३७, व्यापारी ४१२ तर सहकारी संस्थांचे ८३३ मतदार असणार आहेत.
नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १ हजार ४५९ मतदार असून ग्रामपंचायत सदस्य १ हजार ९४, व्यापारी ८० तर सहकारी संस्थांचे २८५ मतदार असणार आहे.
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ११०५ मतदार असून यात ग्रामपंचायत अंतर्गत ६२७, हमाल मापाडी ६६, व्यापारी ११२ तर सहकारी संस्थेतील ३०० मतदार असणार आहे.
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीं सर्वाधिक २ हजार ८३५ मतदार असून यात ग्रामपंचायत अंतर्गत १३९०, हमाल मापाडी २११, व्यापारी २५० तर सहकारी संस्थांचे ९८४ मतदार असणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0


अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सर्वात कमी ९९१ मतदार असून तरी यात ८५७ मतदार ग्रामपंचायत अंतर्गत असणार आहेत तर ६० व्यापारी व सहकारी संस्थांचे ७४ मतदार मतदान करणार आहेत.
धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १ हजार १८ इतके मतदार असून यात ८४७ ग्रामपंचायत, २ हमाल मापाडी, १७ व्यापारी तर १५२ सहकारी संस्थांचे मतदार असणार आहे. सर्वाधिक मतदार जिल्ह्यात ग्रामपंचायतींतर्गत ६ हजार ६०, सहकारी संस्थांचे २ हजार ६२८, ९२१ व्यापारी तर हमाल मापाडी ५१६ इतके मतदार असणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील मतदारांवर बाजार समितींची मदार अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. १८ संचालक पदांसाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूक पार पडत असून यात एका जागेसाठी ३ ते ४ नामांकने दाखल झाली आहेत. यामुळे प्रबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष, गटाकडून केला जात असून उर्वरित ठिकाणी माघार घ्यावी यासाठी नेत्यांकडून मनधरणी केली जात आहे.

जीवन पाटील, कार्यकारी संपादक एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here