KRUSHI NER:उत्पन्नात वाढ,खर्चात बचत – विपणन व्यवस्थापक बी एस चव्हाण..

0
170

नेर/धुळे -२७/७/२३

रासायनिक खतांचा अतिवापराने शेती व पर्यावरणाची मोठी हानी होत असून खतांचा बरोबर जैविक खतांचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ होते व खर्चातही बचत होते असे प्रतिपादन कृभकोचे राज्य विपणन व्यवस्थापक बी एस चव्हाण यांनी केलं ..
नेर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्त कृषक भारती को. ऑपरेटिव्ह लि. ( कृभको) मुंबईच्या वतीने नेर ता. जि. धुळे येथे कृभको खते प्रचार व प्रसार अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होत ..यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

MANIPUR VIOLENCE PROTEST:आदिवासी संघटनांच्या हाकेला नंदुरबारमधील व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्षांची साद..
कंपनीचे निवृत्त प्रबंधक श्री एन वाय साळुंखे यांनी रासायनिक खते वापर व कंपनीचे कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेर चे माजी सरपंच व उद्योजक शंकरराव खलाणे हे होते तसेच कृभको कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक डी एन सूर्यवंशी व इफको कंपनीचे व्यवस्थापक कलीम शेख,आर सी फर्टीलायझर्सचे मनोहर पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जानकी ऍग्रो सर्विसेस चे संचालक शरद शेठ यांनी केले तर आभार प्रदर्शन कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक उमेश महाले यांनी केले.यावेळी कंपनीच्या उत्पादनाच्या प्रचार व प्रसार व्हॅनचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला परिसरातील नेर, भदाणे, अकलाड, खंडलाय, देऊर, नांद्रे, लोणखेडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी ,दिलीप साळुंखे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here