धडगाव तालुक्यातील मजुरांची माझलगावात पिळवणूक

0
212

ठरल्यानुसार मजूरी नाही ; दोन महिन्यापासून पैसे न दिल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ

नंदूरबार :- धडगाव तालुक्यातील राडीकलम, घाटली, खामला, बोदला, मांडवी, वलवाल येथील ४० आदिवासी बांधव बीड जिल्ह्यातील माझलगाव येथील वाघोरा येथे एका खाजगी प्रोडक्ट आणि ऑइल कंपनीत कामासाठी गेले आहेत. मात्र, तेथील ठेकेदारांनी ठरल्याप्रमाणे मजुरी न देता कमी मजुरी आणि दैनंदिन हजेरी कमी दाखून, दोन शिप्टच्या ड्युटीची नोंद न करता मजुरांची पिळवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मजुरांनी स्थानिक प्रशासनाला विनंती करीत असल्याचा व्हिडीओ आदिवासी जनजागृतीला पाठविण्यात आल्याने सदर प्रकार समोर आला आहे. वारंवार अशा घटनानी आदिवासी मजुरांची दिशाभूल आणि पिळवणुकीच्या घटना घडत आहेत.

541065af 6a7d 4ac2 8b31 46eae09724bc

धडगाव तालुक्यातील राडीकलम, घाटली, खामला, बोदला, मांडवी, वलवाल या गावातून बीड जिल्ह्यातील माझलगाव येथील वाघोरा येथे मागील चार महिन्यापूर्वी मजूर कामासाठी गेले होते. तेथील तीन ठेकेदाराकडे चार महिन्यापासून कामे केलीत त्याचे १ महिन्याची मजुरी देखील मिळाली. नंतरच्या ३ महिन्याची मजुरी दिली नाही. कंपनीचे काम बंद झाल्याने गावाकडे घरी येण्यासाठी मजुरांनी ठेकेदाराकडे मजुरीची मागणी केली असता आज देऊ उद्या देऊ असे करत मागील आठ दिवसापासून ताटकळत ठेवले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तसेच खाजगी प्रोडक्ट आणि ऑइल कंपनीच्या ठेकेदारांनी ठरल्याप्रमाणे ४०० रुपये न देता ३५० मजुरी देणार असल्याचे सांगितले जात आहे. कमी मजुरी आणि त्यात दैनंदिन हजेरी कमी नोंदविल्याचे मजूर म्हणत आहे. तसेच मजुरांनी केलेल्या दोन शिप्टच्या ड्युटीची नोंदच केली नाही अश्या पद्धतीने कामे करून घेतल्यानंतर मजुरांची पिळवणूक करीत आहे. खामला येथील एक मुकादम असून या पिळवणूकीत त्याचा देखील हात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. तसेच हातात पैसे नसल्याने धान्य नाही , शिधा संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या मजुरीचे पैसे मिळवून आमची सुटका करावी, अशी विनवणी करण्यात येत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मजुरांचे पिळवणूक करण्याचा प्रकार हा नवीन नसून अनेक वेळा असा अमानुषातेचा प्रकार समोर आला आहे मागील महिन्यातच भमाणा येथील उसतोड मजुरांना डांबून ठेवल्याचा प्रकरण ताजे असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. अश्या घटनांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मजुरावर अमानुषवागणूक देणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here