नंदुरबार : १३/३/२३
रात्री दीड वाजता चोरट्यांनी शेतकऱ्यांकडून १४ लाखाची रोकडे पळवून नेली, या गोष्टीवर आधी विश्वासच बसला नाही. अधिकाऱ्यांकडून खात्री करून घेतल्यावर तपासाच्या सूचना दिल्या.
सदर गुन्हा हा शेतकऱ्यांच्या भावनांशी असल्याने आमचे कर्मचारी २ रात्री झोपले नाहीत.
३० तासात चोरटे व शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कमावलेली पूर्ण रक्कम परत मिळवण्यात यश आले. सिनेमात पोलिसांना निगेटिव्ह दाखवले जाते, यामुळे लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
मात्र चांगल्या कामाचे कौतुक झाल्याने निश्चितच जबाबदारी वाढल्याचे भावनिक प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केले.
भालेर येथील दोन शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून व पिस्तूलचा धाक दाखवून चोरट्यांनी १३ लाख ९४ हजाराची रोकड पळवून नेली होती.
या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली
याबाबत पोलीसात गुन्हा दाखल झाला.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शाखा व शहर पोलिसांनी अवघ्या ३० तासात चोरट्यांना जेरबंद केले
व त्यांच्याकडून पूर्ण रकमेसह सुमारे २१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांच्या या धडक कामगिरीमुळे भालेर, नगाव, तिशी व पंचक्रोशीतील गावांतर्फे त्यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तालुका पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार, सपोनि कमलाकर चौधरी, प्रवीण पाटील यांच्यासह भालेरचे जेष्ठ नेते यशवंत पाटील, भास्कर पाटील, अंकुश पाटील, भिका पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पीडित शेतकरी हंसराज पाटील, सुनील गंगाराम पाटील व आदींतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी गुन्हा उकल होण्यासाठी परिश्रम घेणारे गुन्हा अन्वेषण शाखेच्या व शहर पोलीस पथकाचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले की, गुन्हाची उकल करण्याची खूप मोठी जबाबदारी होती. शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा लवकरात लवकर कसा मिळवता येईल हे एक मोठे आव्हान होते.
आमच्या पोलिसांनी २ रात्र जागून काढत चोरटे व चोरीला गेलेली रक्कम मिळवली.
पैशांसाठी भाऊ भावाचा खून करतो.
मात्र चोरट्यांकडे चाकू, पिस्तूल असून त्यांनी इजा केली नाही.
हे शेतकरांचे भाग्य. सिनेमात पोलिसांना नेहमी निगेटिव्ह दाखवले जाते.
त्यामुळे लोकांची पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
मात्र चांगल्या कामाचा जेव्हा असा नागरी सत्कार होतो तेव्हा अजून कामाची जबाबदारी वाढत असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी एलसीबीचे सहाय्यक पालिस निरीक्षक यांनी अहिराणीतून गावकऱ्याशी संवाद साधला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालेर, नगाव व तिशी नागरिकांनी परिश्रम घेतले.
जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार