धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार

0
204

धुळे: साक्री तालुक्यातील धमनार गावानजीकच्या आमराळी शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोऱ्हावर हल्ला केला. त्यात धमणार येथील शेतकरी धीरज गुलाबराव सोनवणे यांच्या दोन वर्षाचा गोऱ्हा जागीच मृत झाला आहे. परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सद्यस्थितीत शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पेरणी व पिकांच्या संरक्षणासाठी शेतात जाणे येणे गरजेचे आहे. मात्र धमणार परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. धमणार येथील शेतकरी धीरज सोनवणे यांच्या शेतात डाळिंब पिकांची लावणी केली आहे. सद्यस्थितीत झाळांना फळे येण्यास सुरुवात झाली आहे. या भागात वन्य प्राणीसह रानडुक्कर यांचा उपद्रव्य आहे. म्हणून धीरज सोनावणे हे पिकांच्या संरक्षणासाठी पहाटे शेतात गेले असता त्यांना गोठ्यातील गोऱ्हाला सुमारे पाचशे मीटर अंतरावर डाळिंबाच्या शेतामध्ये फरफडत नेल्याचे दिसून आले. बिबट्याने गोऱ्हावर हल्ला चढवून फस्त करून ठार केले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. पिंपळनेर वनपरिक्षेत्र आधिकारी डी.आर.अडकीने यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसदी वनपाल डी.पी.पगारे, वन कर्मचारी रमेश बच्छाव यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला. शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली जाईल, असे सांगितले. या परिसरात बिबट्याचा वावर असून अनेकवेळा शेतकऱ्यांना, शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होत असते. त्यामुळे या परिसरात शेतकरी दहशतीखाली वावरत आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांनी केली आहे.

✍🏻 दिलीप साळुंखे. एमडीटीव्ही न्युज, धुळे ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here