मुंबई /नंदुरबार-१८/४/२०२३
उन्हाळा आला जीव घामाघुम झाला..
सोपे सोपे नियम पाळू या कडक या उन्हाला आपण सारे हरवूया
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नियम एक
पुरेसे पाणी प्या ताक लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या
नियम दोन
पांढऱ्या सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरू डोक्यावर टोपी घालू
नियम तीन
आपली बाहेरील कामे सकाळी दहाच्या आत नाहीतर संध्याकाळी चार नंतर करा
नियम चार
चहा नको ,कॉफी नको, दारू नको, कार्बोनेटेड द्रव पदार्थ नको..
नियम पाच
भर दुपारी गॅस किंवा चुली समोर स्वयंपाक करणे टाळा..
स्नायूंना गोळे ,थकवा ,घाम,अस्वस्थता,गुंगी अशी लक्षणे आढळली तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या..
उन्हाळा आल्यावर सर्वांचाच जीव कासावीस होतो..
घामानं हैराण झालेल्या नागरिक बंधू-भगिनींनो,
सर्वांच्या जनहितार्थ प्रसारित या पाच नियमांच पालन केल्यास उष्माघातापासून आपण वाचू शकतो..
हा संदेश आणि ही बातमी सर्वांना शेअर करा आणि उष्माघातापासून आपल्या बंधू-भगिनींचा जीव वाचवूया..
जनहितार्थ प्रसारित ,सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन..
एम.डी .टी.व्ही. न्यूज ब्युरो मुंबई/नंदुरबार