नंदुरबार :३१/३/२३
नंदुरबार जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्द्चे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा घेण्यात येत असतो.
घरफोडीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
दिनांक 29 मार्च रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील वेडुभाऊ गोविंद नगरमध्ये एक धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील धनेर गावाचा तरुण राहात असून काही एक काम धंदा करीत नाही तसेच त्याच्या हालचाली ह्या संशयास्पद वाटत आहे ..
अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमी मधील संशयीतास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
संशयीत आरोपीताकडुन नंदुरबार जिल्हयातील मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणून अधिक विचारपुस केली असता, त्याने व त्याचे इतर दोन साथीदार यांचे मदतीने नंदुरबार शहरातील सुमारे चार महिन्यापुर्वी गाझी नगर लगत असलेली बॅटरी इन्व्हर्टर दुकान तसेच एस्सार पेट्रोलपंप शेजारी बॅटरी इन्व्हर्टरचे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन इन्व्हर्टर व बॅटऱ्या, नंदुरबार शहरातीलच वृंदावन कॉलनी, वर्धमान नगर, वेडुभाऊ गोविंद नगर येथील बंद घराचे कुलुप, कोयंडा तोडून घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम, LED TV तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शिवपूर व अंबापूर परिसरातील व इतर शेत शिवारातील सौर ऊर्जा प्लेट चोरी केले बाबत सविस्तर हकिगत सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेला हेमंत अनिल सोनवणे यास त्याने चोरी केलेला मुद्देमालाबाबत विचारले असता चोरी केलेल्या 02 मोटार सायकलच्याा बॅटऱ्या व 01 इन्व्हर्टर त्याचे धानोरा येथील गॅरेजमधून अनोळखी इसमांना विक्री केल्याचेे व उर्वरीत बॅटऱ्या व 04 इन्व्हर्टर त्याच्या धनेर ता.साक्री जि.धुळे येथील त्याच्या राहते घरी लपवून ठेवल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून नंदुरबार जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्द्चे एकुण 07 गंभीर गुन्हे उघडकीस आणून 9,50,875/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 10 हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, पोलीस अंमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके,शोएब शेख, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.
प्रविण चव्हाण ,एम. डी. टी.व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.