म. ज्योतिबा फुले जयंती : प्रतिमा पूजन व मोफत पाणपोईचे उद्घाटन

0
121

शिंदखेडा /धुळे -१२/४/२३

येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती माळी वाडा जनता नगराच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भगवा चौकात कार्यक्रम घेण्यात आला ..
प्रतिमेचे पूजन गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले ..
तर माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नेते दयाराम आबा माळी, शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्निल देसले, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी, देवाबापू माळी, अँड.प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
तसेच शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारासमोर मोफत पाणपोई चे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात असुन विविध शाळांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची माहिती विषयक पुस्तिका वाटप करण्यात आले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0
तसेच सायंकाळी भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीचे अध्यक्ष हेमराज गोकुळ जाधव, उपाध्यक्ष प्रमोद देवराम माळी, सचिव राहुल सखाराम माळी, खजिनदार हर्षल भास्कर माळी, सागर माळी, प्रवीण माळी, जयेश माळी, रोहित देशमुख, आकाश माळी, गणेश माळी, ललित देशमुख, योगेश माळी, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यादवराव सावंत, प्रतिनिधी ,शिंदखेडा ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here