मुंबई :०१/०१/२०२३
सध्या मुंबईत विधान भवन परिसरात अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्य सरकारच सुरू आहे..
विविध प्रश्न आणि मुद्द्यांवरून ते वादळी ठरत आहे. नुकतंच गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली वाढ याबाबत विरोधी पक्षांनी सरकारला घेरलं..
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 350 दरवाढ झाली आहे..
आता हॉटेलमध्ये चहा घ्यायला गेलो तरी पैसे अधिक मोजावे लागतील..
तसंच मध्यमवर्गीय महिला खेड्यातील जनता आदिवासी गोरगरीब जनता यांना पन्नास रुपये वाढ देखील अधिक होते..
अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.. नेमकं ऐकू या जयंत पाटील काय म्हणाले..
राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज जोडणी देण्याऐवजी वीज तोडणीचं काम हे राज्य सरकार करतंय असा गंभीर आरोप राज्य सरकारवर जयंत पाटील यांनी केला..
वेगवेगळे मुद्दे आणि प्रश्न जसे जसे समोर येतील त्या पद्धतीने या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारू असे देखील त्यांनी म्हटलं.
कांदा प्रश्नावर त्यांनी विशेष लक्ष घातलं कांदा प्रश्नावरून सरकारला घेण्यासाठी आम्ही तयार आहोत कांदा प्रश्नावर नेमकं तोडगा काढण्यासाठी सरकार तयारी दाखवत नसल्याचं त्यांनी म्हटलं..
यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत..
विधान भवनाबाहेर वीज दरवाढ आणि महागाई मुद्दयावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली..
महिलाविरोधी भूमिका घेणार हे सरकार आहे,ना महिलांच्या सुरक्षेचा विचार ना त्याच्या आरोग्याचा .. गॅस दर गगनाला भिडले मग करायचं काय खाली डोकं वर पाय …. या सरकारला करा आता बाय बाय .. शेतकऱ्याला वीज जोडणी दिलीच पाहिजे अशा विविध घोषणांनी विधान भवन परिसर विरोधकांनि गाजवला ..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई