आरोग्य हीच संपत्ती हा संदेश दिला महाआरोग्य शिबिरातून..

0
163

नंदुरबार : १०/२/२०२३

सध्या शासनाचा आरोग्य विभाग बालकांसह नागरिकांच्या आरोग्यासाठी सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय.. जागरूक पालक सुदृढ बालक अभियानासह मोफत आरोग्य तपासणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्यात येते.

तळोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोरद येथे मोफत आरोग्य तपासणी सह महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं. तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी उद्घाटन केलं.

borad2
आमदार राजेश पाडवींसह उपस्थित डॉक्टर आणि सहकारी

तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण डॉक्टर स्वाती पावरा डॉक्टर पंकज पावरा डॉक्टर अरुण लांडगे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यिका आरोग्य सेवक आरोग्य
सेविका नर्स आशा वर्कर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस गावातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

नंदुरबारहुन निलेश अहेर शहर प्रतिनिधी एमडीटीव्ही न्यूज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here