मुख्यमंत्री शिंदे निघाले अयोध्येकडे तर फडणवीसांची स्वारी दिल्लीकडे ..

0
115

मुंबई – ९/४/२३

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह जय श्रीराम म्हणत अयोध्येला रवाना झाले आहे. या दौऱ्यात भाजपचे नेते सुद्धा सामील झाले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिल्लीला जाणार आहे. दिल्लीतून ते अयोध्येत जाणार असल्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह विमानाने अयोध्येला रवाना झाले आहे.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहे.

कर्नाटक निवडणूक समितीच्या बैठकीकरीता दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली येथून ते अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे अयोध्येत दिसणार आहे.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्सआणिमहत्वपूर्णमाहिती! त्यासाठीक्लिककराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

दरम्यान, अयोध्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही अयोध्येमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर विखे पाटील अयोध्येला जाण्यासाठी सोलापूरहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. विखे पाटील यांनीही मी अयोध्येला जाणार आहे, याला दुजोरा दिला आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते गिरीश महाजन आणि संजय कुटे हेदेखील अयोध्या दौऱ्यावर आहे.

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावेळी झालेल्या ऑपरेशन गुवाहाटीमध्ये पडद्यामागे संजय कुटे यांची प्रमुख भूमिका होती.

संजय कुटे यांची ओळख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि संजय कुटे अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here