Marathi Breaking News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी..

0
110

Chhatrapati Sambhajinagar Crime News : *अपघातानं डोक्यावर परिणाम, तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; आई धावली, रुग्णालयात नेलं, पण…

२३ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, उपचार सुरू असताना काल बुधवारी दुपारी तीन वाजता शेतकरी पुत्राचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली.

यावेळी राहुल हा गळफास घेत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आलं आणि आई धावत त्याच्याकडे गेली.

आरडाओरड करत कुटुंबातील सदस्यही त्याच्याकडे धावत गेले. त्याला तात्काळ खाली उतरून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना काल त्याचा दुपारी तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे गणेश काळे करत आहेत.

*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांना बारसू येथे जाताना पोलिसांनी घेतलं ताब्यात, राऊतांसह ८ ते ९ जण पोलिसांच्या ताब्यात.

*जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता. तब्बल १० वर्ष सुरु होता खटला.

*सुदान मधील बचावकार्यासाठी तिसरी युद्धनौका मुंबईहून रवाना. मुंबईत गृहतळ असलेली आयएनएस तर्कश पोर्ट ऑफ सुदानला पोहोचली. ३२६ भारतीयांना घेऊन तर्कश जेद्दाहला पोहोचली. आयएनएस सुमेधा व आयएनएस तेग भारतीयांना सोडून पुन्हा पोर्ट ऑफ सुदान ला पोहोचली..

*लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसामुळे लातूर-जहिराबाद मार्ग ठप्प.

*कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात..

*अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, नगर, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी आणि कर्जत या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान. आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांनीही लक्ष घातल्याने बहुतांश ठिकाणी चुरस. उद्या शनिवारी होणार मतमोजणी.

*बारसूच्या लोकांचा सरकारवर विश्वास नाही – संजय राऊत

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,नंदुरबार /नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here