बाजार समिती निवडणूक निकाल: जाणून घ्या सर्व अपडेट्स
29 Apr 2023 12:35 PM (IST)
Nandurbar APMC election Result
– नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का.
– नंदुरबार बाजार समितीच्या ११ जागांच्या निकाल आला आहे.
– १८ पैकी ११ जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा– मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बाजार समितीत.
– डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी नंदुरबार बाजार समिती प्रतिष्ठेची होती मात्र गावित यांना मोठा धक्का.
मोठी बातमी : नंदुरबारमध्ये पुन्हा मतमोजणी, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का
– नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे.
– डॉ. गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांचा बाजार समिती निवडणुकीत पराभव झाला आहे.
हे देखील वाचा:
– शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विक्रम वळवी यांनी 09 मतांनी प्रकाश गावित यांचा पराभव केला.
– मात्र, प्रकाश गावित यांनी ऑब्जेक्शन घेतल्याने पुन्हा मतमोजणी करण्यात येत आहे.
सांगली येथील विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर
– विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि काँग्रेस अशी युती झाली आहे.
– या निवडणुकीत युती आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल पिछाडीवर आहे.
– राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल विरुद्ध शिवसेना,भाजपा आणि काँग्रेस आघाडी यांच्यात येथे लढत होत आहे.
– शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एकत्रित येत हे पॅनल उभे केले होते.
अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडे यांचे वर्चस्व, पंकजा मुंडे यांना धक्का
– अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
– भाजपला मात्र 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
– 1 जागेचा निकाल येणे अद्याप बाकी आहे.
– अंबाजोगाई हे परळी आणि केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संयुक्त आहे.

